
जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर कोण आहे याबाबत अनेकांना माहित नसेल. ती एक ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे. या खेळाडूचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. सध्या ती एका फुटबॉलपटूला डेट करत आहे.

ऑस्ट्रेलियाची ॲलिस पेरी ही सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक मानली जाते. भारतात महिला प्रीमियर लीगमध्ये ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळते.

एलिस पेरी ही सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर आहे. तिच्या उत्कृष्ट खेळीमुळे ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. खेळाव्यतिरिक्त ही खेळाडू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.

या अष्टपैलू खेळाडूने 2020 मध्ये तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलिस पेरी फुटबॉलर नेट फाईटला आता डेट करतेय. Nate Fite एलिस पेरी पेक्षा जवळजवळ एक वर्ष लहान आहे.

ॲलिस पेरी आणि नेट फाईट यांनी आपले नाते कधीच सार्वजनिक केले नसले तरी ते अनेकदा एकत्र दिसतात.

एलिस पॅरीने याआधी रग्बीपटू मॅट टॉमासोबत लग्न केले होते. दोघांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते, मात्र परस्पर मतभेदांमुळे २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

एलिस पेरी हिने महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून जबरदस्त कामगिरी केली आहे. तिने या सीजनमध्ये सर्वाधिक रन केले आहेत. एलिस पेरीला आरसीबीने १.७ कोटी रुपयांना विकत घेतले होते.