
आयसीसीने एकदिवसीय फलंदाजांसाठी नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या टॉप 10 रँकिंग यादीत टीम इंडियाचे चार फलंदाज आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे टॉप 5 मध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत.

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलने आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या गिलने एकूण 817 गुणांसह आपले स्थान कायम ठेवले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच बाद झाला आहे. असं असूनही पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खराब कामगिरी करूनही बाबर एकूण 770 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन (760) तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावणारा विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानावर आहे. किंग कोहलीचे एकूण 747 गुण आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. हिटमन एकूण 745 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर आयर्लंडचा हॅरी टेक्टर 713 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिचेल 708 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर 702 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा चारिथ असलंका (694) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान (676) अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.