
आयपीएलच्या 16 व्या मोसमानंतर काही महिन्यांच्या अंतराने भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे. भारतात 2016 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचं आयोजन होत आहे. या वर्ल्ड कपच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

ind vs pak world cup

वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. हा हायव्होल्टेज सामना कुठे खेळवायचा हे अजूनही ठरलेलं नाही. मात्र दिल्ली आणि चेन्नई या दोन्हीपैकी एका शहराला आयोजनाचा मान मिळू शकतो.

ind vs pak world cup 2023

दरम्यान वर्ल्ड कप फायनल सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. तर 2 पैकी 1 सेमी फायनलचं आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होऊ शकतं.