
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना 17 जानेवारीला होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा अंतिम सामना जिंकून मालिका 3-0 ने जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिली द्विपक्षीय मालिका आहे.

रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंना अंतिम सामन्यात भाग घेता येईल. यामध्ये संजू सॅमसनचं नाव चर्चेत आहे. संघात असला तरी तो नसल्यासारखाच असतो.

यष्टिरक्षक संजू सॅमसनला शेवटच्या टी20 सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. सॅमसनऐवजी जितेश शर्माला पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. संजूला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे.

ज्येष्ठ फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईऐवजी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. कुलदीप यादव टी20 वर्ल्डकपसाठी पहिली पसंती ठरू शकतो.

मुकेश कुमारला तिसऱ्या सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. मुकेश कुमार पहिल्या दोन सामन्यात हवी तशी छाप पाडू शकला नाही. आता आवेश खान काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भारत संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा, यशवी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान.