
टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी सुरुवात केली. केएलने 58 धावांची नाबाद खेळी केली. केएलने विजयी सिक्स ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना हा 24 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.

तर ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा सामना 'करो या मरो' असा आहे. मात्र ऑस्ट्रेलिया केव्हाही उलटफेर करु शकते. ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना टीम इंडियाने वेळीच न रोखल्यास सामना गमवावा लागू शकतो. ते तिघे कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज मिचेल मार्श पहिल्या वनडेत 4 धावांवर स्वसतात बाद झाला. मात्र मिचेल मार्श याच्यात सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मिचेल मार्शला झटपट रोखावं लागेल.

ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर डेव्हिड वॉर्नर सध्या जोरात आहे. वॉर्नरने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या वनडेत 53 बॉलमध्ये 52 धावांची शानदार अर्धशतकी खेळी. त्यामुळे इंदूरमधील दुसऱ्या वनडेत वॉर्नरला रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

मार्कस स्टोयनिस हा बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघांड्यावर दमदार कामगिरी करतो. स्टोयनिसने पहिल्या वनडेत 29 धावांचं योगदान दिलं. मार्कस स्टोयनिस मॅचविनर खेळाडू आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल, तर मार्श, वॉर्नर आणि स्टोयनिस या तिघांना रोखावंच लागेल.