
टीम इंडियाने इंग्लंडच्या ओली पोप याला 2 जीवनदान दिले. पोप 110 धावांवर असताना अक्षर पटेल याने कॅच सोडला. तर पोप 186 धावांवर असताना केएल राहुल याने अक्षर पटेलचा कित्ता गिरवत कॅच सोडला. पोपचा कॅच पहिल्याच झटक्यात पकडला गेला असता, तर इंग्लंडला मोठी आघाडी घेताच आली नसती.

टीम इंडियाने 232 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या डावात बेछूट अंदाजात बॅटिंग करणारे फलंदाज दुसऱ्या डावात मात्र फ्लॉप ठरले.

दुसऱ्या डावात इंग्लंड विरुद्ध बॉलिंग करताना टीम इंडियाने बऱ्यापैकी पकड मिळवली होती. इंग्लंडची 190 धावांच्या प्रत्युत्तरात 5 बाद 163 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर ओली पोप आणि बेन फोक्स या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला ही भागीदारी महागात पडली.

टीम इंडियाने इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला झटपट गुंडाळलं. मात्र शेपटीच्या फलंदाजांनी टीम इंडियाला रडवलं. रेहान अहमद याने ओली पोप याच्यासह सातव्या विकेटसाठी 64 धावांची निर्णायक आणि गेमचेंजिंग पार्टनरशीप केवी. त्यामुळे इंग्लंडला 200 पार आघाडी घेता आली.

इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. मात्र इंग्लंडने दुसऱ्या डावात बछूट बॅटिंग केली. ओली पोप याने तर वनडे स्टाईल बॅटिंग करत रिव्हर्स स्वीप आणि इतर फटके मारले. इंग्लंडने एकेरी-दुहेरी धावा सहज घेतल्या. उलटपक्षी इंग्लडंने टीम इंडियाला दुसऱ्या डावात सिंगल-डबलसाठी संघर्ष करायला लावला. या दबावातून टीम इंडियाने विकेट्स गमावल्या.