10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी

भारत इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा कशी कामगिरी करतो? याकडे लक्ष लागून आहे. रोहित शर्मा 19 जुलैला होणाऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करणार का? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

| Updated on: Jul 18, 2026 | 3:27 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यात 19 जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात तिसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष लागून आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना म्हणून वावड्या उठल्या आहे. पण बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. (PC-PTI)

2 / 5
बीसीसीआयच्या मते, रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीचा हा काही शेवटचा सामना नसेल. पण या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण मागच्या दोन्ही सामन्यात रोहित शर्मा फेल गेला आहे. त्यात लॉर्ड्सवर त्याची कामगिरी कशी आहे? याबाबतही चर्चा आहे. रोहित शर्माने तिन्ही फॉर्मेटमध्ये लॉर्ड्सवर 4 सामने खेळले आणि त्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. (PC-PTI)

3 / 5
रोहित शर्माने लॉर्ड्सवर दोन वनडे सामनयात 7.5 च्या सरासरीने 15 धावा केल्या आहे. 2022 मध्ये जेव्हा रोहित शर्मा लॉर्ड्सवर खेळला होता तेव्हा 10 चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातही खोलता आलं नव्हतं. यापूर्वी 2018 मध्ये लॉर्ड्सवर आणखी वनडे सामना खेळला होता. यात त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या. (PC-PTI)

4 / 5
रोहित शर्माने लॉर्ड्सवर एक टी20 सामनाही खेळला आहे. हा सामना 2009 मध्ये खेळला होता. त्यात त्याने 8 चेंडूत फक्त 9 धावा करून बाद झाला होता. (PC-PTI)

5 / 5
रोहित शर्माने लॉर्ड्सवर कसोटीत वनडे आणि टी20च्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 2021 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळला होता. यात पहिल्या डावात 83 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 21 धावा करून बाद झाला होता. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us