वनडे क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघ पुरुष संघावर भारी, असा नोंदवला विक्रम

वनडे क्रिकेट इतिहासात भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. आयर्लंडविरुद्द 435 धावांची खेळी करत विक्रमाची नोंद झाली. पुरुष संघालाही जे जमलं नाही ते महिला संघाने केल्याचं या रेकॉर्डवरून दिसून येत आहे.

| Updated on: Jan 15, 2025 | 4:14 PM
1 / 5
भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 400 पार धावांचा पल्ला गाठला.

2 / 5
स्मृती मंधानाने 80 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 135 धावा केल्या. तर प्रतिका रावलने सहाव्या वनडे सामन्यात 154 धावांची खेळी केली. या सलामीच्या जोडीच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकात 5 गडी गमवून 435 धावा केल्या आहेत.

3 / 5
भारतीय महिला संघाचा यापूर्वीचा सर्वात मोठा स्कोअर हा 370 धावांचा होता. ही धावसंख्या भारताने आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात केली होती. आता त्याच्या पुढे जात टीम इंडियाने ऐतिहासिक धावांचा पल्ला गाठला आहे.

4 / 5
महिला वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध 491 धावा ठोकल्या होत्या. 2018 मध्ये डबलिनच्या मैदानात ही खेळी केली होती. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध 1997 मध्ये 455 धावा, न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध डबलिनमध्ये 2018 मध्ये 440 धावा, तर टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध 2025 मध्ये 435 धावांची खेळी केली आहे.

5 / 5
महिला क्रिकेट संघाने पुरुष संघाचा विक्रमही मोडीत काढला आहे. पुरुष संघाचा सर्वात मोठा स्कोअर हा 5 गडी बाद 418 आहे. 2011 मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध इंदुरमध्ये केला होता. आता वनडेतील सर्वाधिक स्कोअरच्या यादीत महिला संघ पुढे निघाला आहे.