
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर श्रीलंकेला एका वादळाचा सामना करावा लाागू शकतो. कारण इथे भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॅट आग ओकते. हे तेच मैदान आहे जिथे 3 वर्षांपूर्वी रोहित शर्माने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला होता. रोहित शर्माच्या झटपट खेळीसमोर प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजचा संघ उद्ध्वस्त झाला होता. रोहित शर्माने 2018 साली वेस्ट इंडिजविरुद्ध लखनौमध्ये शानदार शतक झळकावले होते. (PC-AFP)

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 111 धावांची खेळी केली होती. या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. रोहितने षटकार आणि चौकारांच्या जोरावर तब्बल 74 धावा फटकावल्या होत्या. रोहितचा स्ट्राईक रेट 181.96 इतका होता. (PC-AFP)

रोहित शर्माचे हे चौथे टी-20 शतक होते. या शतकासह रोहितने विश्वविक्रम केला. T20 मध्ये चार शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला. रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धही अशी कामगिरी करू शकतो. (PC-AFP)

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध टी-20 शतकही ठोकले आहे. रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. तेव्हा रोहितने 118 धावांची खेळी उभारली होती. रोहितने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धही टी-20 शतके झळकावली आहेत. (PC-AFP)

रोहित शर्माचे श्रीलंकेविरुद्धचे आकडे अत्यंत खराब आहेत. रोहित शर्माची श्रीलंकेविरुद्धची सरासरी केवळ 22.23 इतकी आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रोहितला दोनदा शून्यावर बाद केले आहे. रोहितच्या आगामी मालिकेतील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. (PC-BCCI)