
अभिषेक शर्मा हा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बेभरवशी फलंदाज ठरला. त्याच्याकडून या स्पर्धेच्या सुरुवातीला फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने भारतीया क्रीडाप्रेमींची निराशा केली होती. पण सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याला सूर गवसला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकलं. (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 183.33चा होता. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं नववं अर्धशतक होतं. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं अर्धशतक ठोकत एक कारनामा केला आहे. (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने या डावात संजू सॅमसनसोबत ओपनिंग पार्टनरशिप म्हणून मोठी भागीदारी केली. या दोघांनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतासाठी 48 धावांची भागीदारी केली. तर इशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी म्हणजेच 72 धावा काढल्या. (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने या सामन्यात जबरदस्त खेळी केली. सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. पण त्यानंतर आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला. त्याने चौकार आणि षटकार मारताना कोणतीच कसर सोडली नाही. त्याने या डावात जितके चौकार मारले, तितकेच षटकार मारले. (Photo: BCCI Twitter)

अभिषेक शर्माने या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम केला होता. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध थोडाफार खेळला. पण झिम्बाब्वेविरुद्ध पूर्ण लय मिळाल्याचं दिसलं. (Photo: BCCI Twitter)