IND vs ZIM : झिम्बाब्वेने पराभूत करताच भारताचं ते स्वप्न भंगलं, झालं असं की..

टी20 मालिकेतील झिम्बाब्वे विरुद्धचा पहिलाच सामना गमवल्याने टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. हा सामना जिंकला असता तर भारताच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला असता. मात्र तसं काही झालं नाही. आता भारताला आणखी 12 सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे.

| Updated on: Jul 06, 2024 | 10:25 PM
1 / 6
झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या 116 धावांचं आव्हान भारताला गाठता आलं नाही. भारताचा संपूर्ण 102 धावांवर बाद झाला. त्यामुळे दुबळ्या संघाकडून पराभूत होण्याची तिसरी वेळ ठरली. या पराभवामुळे नवख्या खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होत आहे.

2 / 6
शुबमन गिलला आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात एक मोठा विक्रम नोंदवण्याची संधी होती. मात्र या संधीचं सोनं करण्यात टीम इंडियाला अपयश आलं. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

3 / 6
भारताने 2024 या वर्षात टी20 क्रिकेटमध्ये पहिल्याच पराभवाची नोंद केली आहे. यापूर्वी भारताने सलग 12 सामने जिंकले होते. तसेच कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे झालाच नव्हता.

4 / 6
2024 वर्षात भारतीय संघ पहिली मालिका अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. तीन सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली. त्यानंतर टी20 वर्ल्डकपआधी झालेल्या सराव सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सलग 8 सामने जिंकले.

5 / 6
2021 ते 2022 पर्यंत टीम इंडियाने सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. यावेळीही टीम इंडियाने सलग 12 सामने जिंकले. पण सलग 13 सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

6 / 6
अफगाणिस्तानने 2018 ते 2021 पर्यंत सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम बर्म्युडाच्या नावावर आहे. बरमुडाने 2021 ते 2023 या कालावधीत सलग 13 सामने जिंकले होते.