IPL : एका मोसमात एकूण 260 धावा, मात्र एक सिक्सही नाही, कोण आहे तो फलंदाज?

Most Runs In IPL Season Without Hitting Six : एका फलंदाजाने आयपीएल स्पर्धेत 2013 साली कमाल केली होती. या फलंदाजाने तेव्हा 250 पेक्षाही अधिक धावा केल्या होत्या त्याही एकही षटकार न लगावता. जाणून घ्या तो कोण आहे.

| Updated on: May 01, 2026 | 5:42 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक हंगामात क्रिकेट चाहत्यांना फलंदाजांकडून विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळते. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा त्याच्या खेळीत अपवाद वगळता चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावतो. मात्र या स्पर्धेत 2013 साली एक असा फलंदाज होता ज्याने संपूर्ण मोसमात एकही सिक्स न लगावता सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : GETTY)

2 / 5
मनदीप सिंह याने 2013 साली 16 सामन्यांत पंजाबचं प्रतिनिधित्व केलं होतं. मनदीपने 2013 साली एकाही सिक्सशिवाय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. मनदीपने तेव्हा एकूण 36 चौकारांसह एकूण 260 धावा केल्या होत्या. (Photo Credit : GETTY)

3 / 5
मनदीप आयपीएल स्पर्धेत 2009 पासून ते 2023 पर्यंत खेळला आहे. मनदीप या दरम्यान 111 सामने खेळला आहे. मनदीपने या दरम्यान 20.80 च्या सरासरीने एकूण 1 हजार 706 धावा केल्या आहेत. मनदीपने आयपीएल कारकीर्दीत एकूण 176 चौकार आणि 38 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : GETTY)

4 / 5
मनदीपने 2016 साली टीम इंडियासाठी पदार्पण केलं. मनदीपने टीम इंडियाचं 3 टी 20i सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. मनदीपने या 3 सामन्यांत एका अर्धशतकासह एकूण 87 धावा केल्या. मात्र त्यानंतर मनदीपला संधीच मिळाली नाही. (Photo Credit : GETTY)

5 / 5
मनदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली आहे. मनदीप 105 फर्स्ट क्लास, 137 लिस्ट ए आणि 214 टी 20 सामने खेळले आहेत. मनदीपने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 6 हजार 965, 4 हजार 180 आणि 4 हजार 43 धावा केल्या आहेत.(Photo Credit : GETTY)

Follow Us