Akash Madhwal | ‘इंजिनिअर’ आकाश मढवाल याच्याकडून लखनऊचं मजबूत ‘बांधकाम’, दिग्गजांना पछाडत मोठा रेकॉर्ड

आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 5 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सचा विजय सोपा केला. मढवालने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Sanjay patil | Updated on: May 25, 2023 | 1:12 AM
1 / 6
मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.

2 / 6

इंजिनिअर असलेल्या मढवालने लखनऊला निर्णयक क्षणी धक्के दिले. मढवालने यासह लखनऊ टीमचं 'बांधकाम' केलं. मढवालने मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मढवाल पलटणच्या विजयाचा शिल्पकारच ठरला.

3 / 6

आकाश मढवाल याने यासह आयपीएल प्लेऑफ इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेत दिग्गजांना मागे टाकलं. मढवालने डग बॉलिंजर, धवल कुलकर्णी आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकलं.

4 / 6

डग बॉलिंजर याने चेन्नई सुपर किंग्सकडून 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद विरुगद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 13 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

5 / 6

मराठमोळ्या धवल कुलकर्णी याने 2016 मध्ये गुजरात लायन्स कडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 14 धावा देत 4 फलंदाजांचा काटा काढला होता.

6 / 6

तर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल प्लेऑफ 2020 मध्ये 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us