AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला जेम्स अँडरसन 17 वर्षानंतर आयपीएल खेळणार!

जेम्स अँडरसन आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. त्याने इंग्लंडकडून 188 कसोटी सामने खेळले असून 40037 चेंडू टाकले आहेत. तसेच 704 विकेट घेतल्या आहेत. याच वर्षी जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

| Updated on: Nov 06, 2024 | 9:37 PM
Share
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कधीच आयपीएल खेळला नाही. मागच्या 17 पर्वात अँडरसन फक्त देशासाठी खेळला. त्याने आयपीएल लिलावात कधीच नाव नोंदवलं नव्हतं. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

1 / 5
17 वर्षांनंतर जेम्स अँडरसनने आयपीएल लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. वयाच्या 42 व्या वर्षी नाव नोंदवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अँडरसनला आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायचं आहे.

2 / 5
इंग्लंडमधील हंड्रेड लीगदरम्यान बोलताना जेम्स अँडरसन सांगितलं की, या लीगमध्ये गोलंदाजाकडे फक्त 24 चेंडू असतात. विशेष म्हणजे पहिल्या 20 चेंडूंमध्ये चेंडू स्विंग होत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी हे देखील करू शकतो. म्हणून फ्रँचायझी लीग खेळण्याची इच्छा व्यक्त केली. अँडरसनने शेवटचा टी20 सामना 10 वर्षांपूर्वी खेळला होता.

3 / 5
जेम्स अँडरसन आयपीएलसह प्रमुख लीगमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल मेगा लिलावासाठी त्याने बेस प्राइस 1.25 कोटी ठेवली आहे. त्यामुळे 24 आणि 25 नोव्हेंबरला होणाऱ्या मेगा लिलावात जेम्स अँडरसनचेही नाव येण्याची दाट शक्यता आहे. अँडरसनवर कोणता संघ बोली लावतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

4 / 5
जेम्स अँडरसन सध्या इंग्लंडचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. मात्र उर्वरित वेळेत लीग क्रिकेट खेळण्याचा त्याचा मानस आहे. अँडरसनने आपल्या टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 44 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 44 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 32.14 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्यात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...