
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक गुरुवारी 26 मार्च रोजी जाहीर करण्यात आलं. यासह या हंगामातील साखळी फेरीत एकूण 70 सामनेच होणार असल्याचं स्पष्ट झालं. तसेच या वेळापत्रकासह कोणते संघ कोणत्या मैदानात आणि कधी खेळणार? हे निश्चित झालं. सोबतच सीएसकेचा महेंद्रसिंह धोनी आणि आरसीबीचा विराट कोहली हे दोघे एका मैदानात खेळताना दिसणार नाहीत. (Photo Credit : IPL T20.COM)

धोनी आणि विराट व्यतिरिक्त रोहित शर्मा याला 2 मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही. मुंबई इंडियन्सचे बंगळुरु आणि हैदराबादमध्ये 19 व्या मोसमातील सामने होणार नाहीत. त्यामुळे या 2 शहरांमधील चाहत्यांना यंदा मुंबईच्या लाडक्या खेळाडूंना पाहता येणार नाही. (Photo Credit : IPL T20.COM)

धोनी, रोहित आणि विराटचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या तिघांना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये क्रिकेट चाहते हजेरी लावतात. मात्र यंदा काही मैदानात चाहत्यांना या तिघांना पर्यायाने त्यांच्या संघाना पाहता येणार नाहीय. धोनी आणि विराटच्या टीमचा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये एकही सामना होणार नाही. तसेच विराट चेन्नईतील चेपॉक मैदानात खेळताना दिसणार नाही. (Photo Credit : IPL T20.COM)

आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या तुलनेत यंदा 19 व्या पर्वात 12 शहरांमध्येच सामने आयोजित करण्यात आले आहेत. दुपारच्या सामन्यांना अडीच तर संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांची सुरुवात साडे सात वाजता होणार आहे. (Photo Credit : IPL T20.COM)

तसेच या 19 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स घराबाहेर सलग 4 सामने खेळणारी एकमेव टीम असणार आहे. तसेच केकेआर आपल्या घरच्या मैदानात सलग 2 वेळा 3 सामने खेळणार आहे. (Photo Credit : IPL T20.COM)