आयपीएल स्पर्धेत गिल आणि रोहितसारखी कामगिरी करण्यास विराट सज्ज, इतकं केलं की झालं…
Virat Kohli Record: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली एका विक्रमाच्या वेशीवर आहे. आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांनीच पल्ला गाठला आहे. यात या यादीत विराट कोहलीचं नाव जोडलं जाणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 23वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या विराट कोहलीकडे असणार आहे. या सामन्यात एक मोठा विक्रम रचण्याची संधी त्याच्याकडे आहे .आतापर्यंत ख्रिस गेल आणि रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे. (Photo: RCB Twitter)

आयपीएल स्पर्धेत षटकारांचा त्रिशतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहली करू शकतो. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत 300 षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांनी केली आहे. आता लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ही संधी विराट कोहलीकडे आहे. (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीच्या नावावर आता 298 षटकार आहेत. त्याने 271 सामन्यातील 263 डावात ही कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याच्या 300 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. (Photo: RCB Twitter)

विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात दुसरा षटकार मारताच त्याच्या शिरपेचात मानाची तुरा खोवला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेत 300 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरेल. 264 व्या डावात ही कामगिरी आपल्या नावावर करेल. (Photo: RCB Twitter)

ख्रिस गेलने 142 आयपीएल सामन्यातील 141 डावात 357 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्मा 276 सामन्यात 271 डावात 310 षटकार मारले आहेत. (Photo: RCB Twitter)