IPL 2026 : 6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 9 दिवस बाकी असताना 19 मार्च रोजी 3 गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता आणखी एक गोलंदाजाला दुखापतीमुळे या 19 व्या पर्वात खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी एका मागोमाग एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्सनंतर आता सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका लागला आहे. (Photo Credit: PTI)

सनरायजर्स हैदराबादचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज जॅक एडवर्ड्स स्पर्धेतून बाहेर झाला आहे. क्रिकबझनुसार, जॅकला दुखापत झाली आहे. जॅक 19 व्या मोसमाला सुरुवात होईपर्यंत फिट होण्याची शक्यता फार कमी आहे. (Photo Credit: Getty Images)

सनरायजर्स हैदराबादने जॅकला गेल्या मोसमात बेस प्राईजपेक्षा 6 पट अधिक रक्कम दिली होती. जॅकची बेस प्राईज ही 50 लाख रुपये होती. तर सनरायजर्स हैदराबादने जॅकसाठी 3 कोटी रुपये मोजले. (Photo Credit: Getty Images)

जॅकच्या दुखापतीमुळे सनरायजर्स हैदराबादच्या डोकेदुखीत दुप्पटीने वाढ झाली आहे. आधीच सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांना मुकावं लागलं आहे. (Photo Credit: Getty Images)

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, 19 मार्च रोजी 19 व्या मोसमातून दुखापतीमुळे 3 विविध संघांचे 3 गोलंदाज बाहेर झाले आहेत. या तिघांमध्ये एडवर्ड्स व्यतिरिक्त सीएसकेचा नॅथन एलिस आणि राजस्थान रॉयल्सच्या सॅम करन याचा समावेश आहे. (Photo Credit : Getty & PTI)