
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्टला, तो क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याच समजल्यानंतर एकच धक्का बसला. अलीकडेच एक रिपोर्ट् पब्लिश झाला. त्यात गिलख्रिस्टची नेटवर्थ सचिन, धोनी आणि विराट पेक्षा जास्त असल्याच सांगण्यात आलं होतं.

या रिपोर्ट मागच सत्य स्वत: एडम गिलख्रिस्टने टि्वटच्या माध्यमातून सांगितलं आहे. गिलख्रिस्टने सांगितलं की, त्याची संपत्ती 3100 कोटी रुपये नाहीय. तो सचिन, विराट आणि धोनीपेक्षा श्रीमंत नाहीय. गिलख्रिस्टने पब्लिश झालेला रिपोर्ट चुकीचा असल्याचं सांगितलं.

380 मिलियन डॉलर नेटवर्थ असलेला गिलख्रिसट कोणी दुसराच आहे. असं एडम गिलख्रिस्टने टि्वट करुन सांगितलं. ज्या गिलख्रिस्टची नेटवर्थ 3100 कोटी रुपये आहे, तो एका फिटनेच चेनचा मालक आहे. हा गिलख्रिस्ट अमेरिकेत राहतो. तो F45 फिटनेस जीम चालवतो. जगभरात त्याच्या मालकीच्या अनेक जीम्स आहे.

ऑस्ट्रेलियाच एडम गिलख्रिस्ट सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नाहीय. नेटवर्थच्या बाबतीत सचिन तेंडुलकर त्याच्या वर आहे. 2023 मध्ये सचिनची नेटवर्थ 170 मिलियन डॉलर आहे. धोनीची 115 मिलियन डॉलर आहे. तो दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली 112 मिलियन डॉलरसह तिसऱ्या नंबरवर आहे.

पॉन्टिंग 75 मिलियर डॉलरसह ऑस्ट्रेलियाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. स्टीव्ह स्मिथ 30 मिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहे.