आयपीएल स्पर्धेतील सलग पाच सामन्यात जसप्रीत बुमराहने काय केलं? मुंबई इंडियन्स संघ अडचणीत

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची गाडी विजयाच्या ट्रॅकवरून घसरली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवला, पण त्यानंतर सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. त्यात जसप्रीत बुमराहमुळे टेन्शन वाढलं आहे.

| Updated on: Apr 13, 2026 | 4:28 PM
1 / 5
जसप्रीत बुमराह जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएल स्पर्धेतील पाच सामन्यात त्याची आकडेवारी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात कामगिरी पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेतील मागच्या पाच सामन्यात जसप्रीत बुमराह विना विकेट ठरला आहे. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. मागच्या पाच सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. आयपीएल 2025 स्पर्धेतील शेवटच्या सामन्यापासून ही मालिका सुरू आहे. यंदाच्या चार सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
क्रिकेट डेटा आणि विश्लेषण वेबसाइट क्रिकविझनुसार, बुमराहला सलग 122 चेंडूंमध्ये एकही बळी घेता आलेला नाही. आयपीएलमधील ही त्याची सर्वात मोठी विकेट न घेतलेली कामगिरी आहे. त्यामुळे मागच्या सामन्यात बुमराह अस्वस्थ झाल्याचंही पाहायला मिळालं. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएल 2025 पंजाब किंग्सविरुद्ध 4 षटकात 40 धावा, आयपीएल 2026 केकेआरविरुद्ध 4 षटकात 35 धावा, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकात 21 धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 3 षटकात 32 धावा, आरसीबीविरुद्ध 4 षटकात 35 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळालेली नाही. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुमराहच्या विकेट न मिळालेल्या कामगिरीबाबत भाष्य करत  सांगितले की, बुमराहकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी इतर गोलंदाजांनी आपली कामगिरी उंचावण्याची गरज आहे. बुमराह बहुतेक वेळा अशा स्थितीत गोलंदाजीसाठी येतो, जिथे प्रतिस्पर्धी संघ वरचढ असतो. (Photo: IPL/BCCI)

Follow Us