जोस बटलर टी20 क्रिकेटचा नवा राजा, 20 चेंडूत अर्धशतक ठोकत गाठलं अव्वल स्थान
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट ते फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये त्याने एक मोठा पल्ला गाठला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याला मिळाला आहे.

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलर टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचा नवा राजा ठरला आहे. जोस बटलरच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रचला गेला आहे. (Photo: Getty Images)

द हंड्रेड लीग स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या बटलने वेल्श फायरविरुद्ध 20 चेंडूत 51 धावांची वादळी खेळी केली. या खेळीसह त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo: Getty Images)

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा मान मिळवण्यासाठी त्याला फक्त 22 धावांची गरज होती. या धावा त्याने काही चेंडूतच पूर्ण केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं. (Photo: Getty Images)

जोस बटलरने 522 टी20 सामन्यातील 492 डावात 14833 धावा केल्या आहेत. या धावांमध्ये आणखी भर पडेल यात काही शंका नाही. पण या धावांसह त्याने कायरन पोलार्डचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. (Photo: Getty Images)

जोस बटलरपूर्वी वेस्ट इंडिजचा दिग्गज कायरन पोलार्डच्या नावावर 14803 धावा होत्या. त्याने काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलचा 14562 धावांचा विक्रम मोडला होता. (Photo: Getty Images)