
कर्नाटकच्या प्रखर चर्तुवेदी या युवा फलंदाजाने साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रखरने मुंबई विरुद्ध कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 404 धावांची तडाखेदार नाबाद खेळी केली. यासह प्रखरने युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला.

प्रखरने नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 638 चेंडूत नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 46 चौकार आणि 3 सिक्स लगावले.

प्रखरने केलेल्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 809 धावांपर्यंत मजल मारली. प्रखर कूच बिहारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

प्रखरच्या आधी 4 दिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक मोठ्या खेळीचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. मात्र प्रखरने 404 धावा करत युवराजला मागे टाकलं.

भारतातील अंडर 19 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे. विजयने 2011-12 साली आसाम विरुद्ध नाबाद 451 धावा केल्या होत्या

युवराज सिंह याने 2000 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात धमाका केला होता. युवराजने तेव्हा 358 धावा केल्या होत्या. मात्र आता प्रखरने युवराजला मागे टाकलं आहे.