RCB vs DC: आयपीएल स्पर्धेला 18 वर्षे पूर्ण, आज आरसीबी रचणार शतकी इतिहास; जाणून घ्या

RCB 100th IPL match Chinnaswamy: आयपीएल स्पर्धेतील 26वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात आरसीबी संघ विक्रम आपल्या नावावर करणार आहे.

| Updated on: Apr 18, 2026 | 2:22 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेला 18 एप्रिल रोजी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत या स्पर्धेला 18 एप्रिल 2008 रोजी सुरूवात झाली होती. या स्पर्धेतील पहिला सामना एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला गेला होता. त्यामुळे  18 वर्षानंतर हे मैदान पुन्हा एकदा खास ठरणार आहे. (Photo: RCB Twitter)

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील 26वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा 100वा आयपीएल सामना आहे. या मैदानात आरसीबी 100 सामने खेळणारी पहिली फ्रेंचायझी ठरेल. (Photo: RCB Twitter)

3 / 5
आयपीएल स्पर्धेत 18 वर्षानंतर त्याच दिवशी सामना होत असल्याने हा योगायोग जुळून आला आहे. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियममध्येच आपला पहिला सामना खेळला होता. हे आरसीबीचं होमग्राउंड आहे. गेल्या 18 वर्षात आरसीबीचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. (Photo: RCB Twitter)

4 / 5
आयपीएल स्पर्धा आणि आरसीबी संघासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. आयपीएलची सुरूवात जेथे झाली तिथेच एक संघ 100 सामने पूर्ण करत आहे. हा एक दुर्मिळ योग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आरसीबी आणि चिन्नास्वामी स्टेडियम हा इतिहास कायम स्मरणात ठेवेल. (Photo: RCB Twitter)

5 / 5
आरसीबी आजच्या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून उतरणार आहे. आरसीबी संघ 2011 पासून ग्रीन इनिशिएटिव्ह मोहीम राबवत आहे. दरवर्षी एक सामना हिरव्या जर्सीसह खेळतात. ही जर्सी वेस्ट मटेरियल रिसायकल करून तयार केली जाते. (Photo: RCB Twitter)

Follow Us