विराट कोहलीच्या फॅनचा महिला क्रिकेटमध्ये धमाका; स्मृती मंधानाच्या विक्रमाशी बरोबरी करत रचला इतिहास!

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि विराट कोहलीची मोठी फॅन लॉरा वोल्व्हार्टने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 62 चेंडूंत 126 धावांची ऐतिहासिक आणि नाबाद वादळी खेळी खेळली. तिने या कामगिरीसह स्मृती मंधानाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

| Updated on: Sep 16, 2026 | 2:38 PM
1 / 5
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेने आधी खेळताना 20  षटकांत 1 बाद 200 धावा कुटल्या.  प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 120 धावांवर गारद झाला आणि आफ्रिकेने 80 धावांनी मोठा विजय मिळवला. (Photo: PTI)

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेने आधी खेळताना 20 षटकांत 1 बाद 200 धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 120 धावांवर गारद झाला आणि आफ्रिकेने 80 धावांनी मोठा विजय मिळवला. (Photo: PTI)

2 / 5

कर्णधार लॉरा वोल्व्हार्टने 62 चेंडूंत 16 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 126 धावांची नाबाद आणि वादळी खेळी खेळली. तिने अवघ्या 54 व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. ही 126 धावांची खेळी दक्षिण आफ्रिकेच्या महिला टी20 इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली असून तिने शांद्र फ्रिट्जचा116 धावांचा रेकॉर्ड मोडीत काढला. (Photo: PTI)

3 / 5

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मिळून लॉरा वोल्व्हार्टचे हे 18 वे शतक होते. महिला क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी केवळ भारताच्या स्मृती मंधानानेच 18 आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता, ज्याच्याशी आता लॉराने बरोबरी केली आहे. (Photo: PTI)

4 / 5

या शतकासह लॉरा वोल्व्हार्ट महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत श्रीलंकेची कर्णधार चामारी अट्टापट्टूसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आली आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 5 शतके ठोकण्याचा जागतिक विक्रम युएईच्या एशा ओजाच्या नावावर आहे. (Photo: PTI

5 / 5

झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयाची मुख्य सूत्रधार ठरलेली लॉरा वोल्व्हार्ट ही भारताचा महान फलंदाज विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे. तिने स्वतः एका मुलाखतीत उघड केले होते की, विराट कोहलीमुळेच 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' हा तिचा सर्वात आवडता आयपीएल संघ आहे. (Photo: Instagram)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us