IPL 2026: हैदराबादची विजयासह कमाल, दिल्लीला पराभूत करत ऑरेंज आर्मीचा खास कामगिरी

SRH vs DC, IPL 2026 : अभिषेक शर्मा याच्या 135 धावांच्या खेळीनंतर एशान मलिंगा याने 4 विकेट्स घेत सनरायजर्स हैदराबादच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना 47 धावांनी जिंकला. हैदराबादचा हा चौथा विजय ठरला.

| Updated on: Apr 22, 2026 | 4:55 PM
1 / 5
सनरायजर्स हैदराबादने मंगळवारी 21 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला. हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सचा 47 धावांनी धुव्वा उडवला. हैदराबादने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. (Photo Credit: PTI)

2 / 5
अभिषेक शर्मा याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने 200 पार मजल मारली. अभिषेकने नॉट आऊट 135 रन्स केल्या. त्या जोरावर हैदराबादने 242 रन्स केल्या. तर  प्रत्युत्तरात दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 195 धावांपर्यंतच पोहचता आलं. (Photo Credit: PTI)

3 / 5
हैदराबादने 20 व्यांदा पहिले बॅटिंग करुन 200 पेक्षा अधिक धावा करुन विजय मिळवला. हैदराबाद अशी कामगिरी करणारी तिसरी टीम ठरली.  (Photo Credit: PTI)

4 / 5
आयपीएल स्पर्धेत हैदराबादने एकूण 24 वेळा पहिले बॅटिंग करताना 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हैदराबादने 24 पैकी 20 सामन्यांत विजय मिळवला. तर हैदराबादला 4 वेळा पराभूत व्हावं लागलेलं. (Photo Credit: PTI)

5 / 5
चेन्नईच्या नावावर पहिले बॅटिंग करताना सर्वाधिक 29 वेळा 200 धावा करण्याचा विक्रम आहे. चेन्नईने त्यापैकी 23 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर गतविजेता आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने 30 पैकी 23 सामन्यांत  विजय मिळवलाय. (Photo Credit: PTI)

Follow Us