
शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात एक खास विक्रम नोंदवला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या या दुर्मिळ अशा विक्रमाची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीही यावेळी सामन्यात खेळत होता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 3 षटके टाकणाऱ्या शिवम दुबेने 36 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. फलंदाजीतही त्याने 32 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 63 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये किमान 1 बळी आणि अर्धशतक झळकावण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

शिवम दुबेने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराट कोहली 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 1 विकेट आणि अर्धशतक झळकावले होते. तसेच 2016 मध्ये विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकासह 1 बळी घेण्यात यश मिळवले होते.

विराट कोहलीने टीम इंडियासाठी टी20 क्रिकेटमध्ये दोनदा 1 बळी घेण्याचा आणि अर्धशतक झळकावण्याचा विशेष विक्रम नोंदवला आहे. आता या विक्रमाची बरोबरी शिवम दुबेने केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावत 1 बळी घेतला. दुसऱ्या सामन्यातही त्याने एक विकेटसह अर्धशतक झळकावले आहे. यासह शिवम दुबेने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

अर्धशतक आणि गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत युवराज सिंग पहिल्या क्रमांकावर आहे. 2009 मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 1 विकेट आणि अर्धशतक झळकावले होते. 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्धही त्याने या पराक्रमाची पुनरावृत्ती केली होती. युवराज सिंगने अशी कामगिरी तीन वेळा केली आहे. जर तिसऱ्या शिवम दुबेने तशीच कामगिरी केली तर युवराज सिंगशी बरोबरी साधेल.