
अनुभवी आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे काही आठवड्यांपासून टीम इंडियापासून दूर आहे. हार्दिकला टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावं लागलं. मात्र आता हार्दिकच्या कमबॅकबाबत अपडेट समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

हार्दिकला आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे हार्दिकला अंतिम सामन्यातही खेळता आलं नव्हतं. हार्दिक या दुखापतीनंतर बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये कमबॅकसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. (Photo Credit : PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे फिट झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक करणार आहे. या स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हार्दिक या स्पर्धेत बडोद्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. (Photo Credit : PTI)

रिपोर्ट्सनुसार, पंड्या दुखापतीनंतर जवळपास फिट झाला आहे. आता सीओईकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हार्दिक विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार हे निश्चित समजलं जात आहे. (Photo Credit : PTI)

दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 नोव्हेंबरपासून वनडे सीरिज खेळणार आहे. पंड्याचं या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक होण्याची अधिक शक्यता आहे. पंड्या त्याआधी बडोद्यासाठी खेळताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)