Team India : सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरपैकी टी 20iमध्ये बेस्ट कोण? पाहा आकडे

Suryakumar Yadav vs Shreyas Iyer : सूर्यकुमार यादव याचं टी 20I कर्णधारपद धोक्यात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला टी 20I संघाच्या कर्णधारपदावरून हटवणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने दोघांची आकडेवारी जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 04, 2026 | 7:44 PM
1 / 5
सूर्यकुमार यादव याने टी 20i कारकीर्दीत 113 सामने खेळले आहेत. तर  श्रेयस अय्यर आतापर्यंत 51 सामने खेळला आहे. या निमित्ताने दोन्ही खेळाडूंपैकी 51 टी 20i सामन्यानंतर कोण सरस आहे? हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सूर्याने 51 टी 20i सामन्यांत 1 हजार 780 धावा केल्या होत्या. तर श्रेयसच्या नावावर 51 टी 20i सामन्यामध्ये  1 हजार 104 धावांची नोंद आहे.  (Photo Credit : PTI)

2 / 5
सूर्या आणि श्रेयस दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. सूर्याने टी 20i कारकीर्दीत 3 शतकं  आणि 14 अर्धशतकं लगावली आहेत. तर श्रेयसने 8 शतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
सूर्याने 51 टी 20i सामन्यांमध्ये 101 षटकार आणि 162 चौकार लगावले आहेत. तर श्रेयसने 51 टी 20i सामन्यांमध्ये 44 षटकार आणि  90 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 5
सूर्याने टी 20i क्रिकेटमध्ये  51 टी 20i सामन्यानंतर एका डावात 117 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. तर श्रेयसची 51 टी सामन्यांनंतर नाबाद 74 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
सूर्या आणि श्रेयस हे दोघेही विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीत आहेत. सूर्याचा 51 टी 20i सामन्यानंतर स्ट्राईक रेट हा 174.33 असा होता. तर श्रेयसचा 51 टी 20i सामन्यानंतर स्ट्राईक रेट हा 136.12 असा आहे. (Photo Credit : PTI)

Follow Us