
टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या पहिस्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने टीम इंडियावर मात करत चौथ्याच दिवशी विजय मिळवला. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीतून केएल राहुल आणि आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा बाहेर पडले आहेत. अशात टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत 4 दिग्गजांशिवाय मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा चांगलाच कस लागणार आहे.

विराट कोहली याने पहिल्या 2 सामन्यातून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे विराट उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी रजत पाटीदार याचा समावेश करण्यात आला आहे.

मोहम्मद शमी याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही खेळता आलं नाही. मात्र शमी इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या 3 सामन्यांसाठी कमबॅक करु शकतो.

रवींद्र जडेजा याला पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी खेळादरम्यान दुखापत झाली. यामुळे जडेजा बाहेर पडला. जडेजाने पहिल्या सामन्यात जडेजाने 89 धावा आणि 5 विकेट्स घेतल्या.

केएल राहुल याचा या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत बॅट्समन म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र दुखापतीने केएलची शिकार केल्याने तो दुसऱ्या सामन्यात नसेल. केएलने पहिल्या सामन्यात एकूण 108 धावा केल्या.