Virat Kohli Records: इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका विराट कोहलीसाठी खास, हे 7 विक्रम असणार रडारवर
भारताचा दिग्गज क्रिकेट विराट कोहली फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. या मालिकेत विराट कोहली काही विक्रम आपल्या नावावर करू शकतो. चला जाणून घेऊयात त्यााबाबत

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज खेळाडू खेळणार आहे. या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना या मालिकेत विराट कोहलीच्या रडारवर एक दोन नाही तर सात विक्रम असणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

विराट कोहलीने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 203 धावा केल्या तर वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावा पूर्ण करेल. पण यासाठी किमान एका सामन्यात शतकी खेळी करणं अपेक्षित आहे. (फोटो-GETTY IMAGES)

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरणार आहे. कारण हा विक्रम त्याच्यासाठी खूपच सोपा आहे. हा विक्रम नावावर करण्यासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकरच्य नावावर 3026 धावा आहेत. तर विराट कोहलीचा आता 3015 धावांवर असून त्याने 9 धावा करताच विक्रम मोडेल. (फोटो-GETTY IMAGES)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एक विक्रमही त्याच्या दृष्टीक्षेपात आहे. हा विक्रमही तसा सोपा आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 16 धावांचा पल्ला गाठू शकतो. यासाठी त्याला 81 धावांची गरज आहे. (फोटो-GETTY IMAGES)

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 150 धावांची खेळी केली तर वनडेत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरले. विराट कोहलीच्या पुढे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनी आहेत. धोनीच्या नावावर 1546 धावा आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर 1397 धावा आहे. (फोटो-GETTY IMAGES)

विराट कोहलीने या मालिकेतील तीन सामन्यात दोन शतकं ठोकली तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणार फलंदाज ठरणार आहे. तर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 50 प्लस धावा करण्यापासून एक पाऊल दूर आहे. (फोटो-GETTY IMAGES)