
विराट कोहलीच्या नावावर अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. विराट कोहलीने आता देशांतर्गत क्रिकेटमधील दीर्घ काळापासून कायम असलेला एक विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहली 12 वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून बराच काळानंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीचे नाव अव्वल स्थानावर आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या ग्रुप डी मध्ये दिल्ली विरुद्ध रेल्वे सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीकडून 12 वर्षानंतर विराट कोहली मैदानात उतरला. कोहलीने 12 वर्षानंतर रणजी स्पर्धा खेळत देशांतर्गत क्रिकेटमध्ये असलेला पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा विक्रम मोडीत काढला.

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम जानेवारी 1986 ते ऑक्टोबर 1997 या कालावधीत 67 कसोटी सामना खेळला. 11 वर्षे आणि 253 दिवसानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला. इतकी वर्षे वसीम अक्रम देशांतर्गत क्रिकेट खेळला नव्हता. त्यामुळे गेली अनेक वर्षे हा विक्रम त्याच्या नावावर होता. आता विक्रम विराट कोहलीने मोडला आहे.

विराट कोहलीने हा विक्रम मोडीत काढला आहे. किंग कोहली 12 वर्षे आणि 86 दिवसांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळला आहे. नोव्हेंबर 2012 ते जानेवारी 2025 या कालावधीत विराट कोहली 113 कसोटी सामने खेळला. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये हजेरी लावली. महेंद्रसिंह धोनी 9 वर्षे 283 दिवस, रोहित शर्मा 9 वर्षे आणि 74 दिवसांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला.

12 वर्षांनंतर रणजी सामना खेळणारा विराट कोहली पहिल्या डावात फक्त 6 धावा करून बाद झाला. असं असलं तरी दिल्लीने हा सामना जिंकला. रेल्वेने पहिल्या डावात 241 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 374 धावा केल्या. दुसऱ्या डावात रेल्वे संघ 114 धावांवर सर्वबाद झाला. दिल्लीने हा सामना एक डाव आणि 19 धावांनी जिंकला.