वाराणसी क्रिकेट स्टेडियमवर कधी पडणार पहिला बॉल? पाहा काय आहे बीसीसीआयचा मेगा प्लॅन!

वाराणसीत क्रिकेट स्टेडियम तयार झालं असून लवकरच या मैदानात सामना पाहण्याची संधी मिळू शकते. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे सामने या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 16, 2026 | 6:30 PM
1 / 5
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, स्टेडियमचे काम पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीचा अंदाज आणि मैदानाची तयारी परखण्यासाठी सर्वात आधी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथे रणजी ट्रॉफीचे  सामने खेळवले जातील. (Photo: X)

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, स्टेडियमचे काम पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीचा अंदाज आणि मैदानाची तयारी परखण्यासाठी सर्वात आधी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथे रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जातील. (Photo: X)

2 / 5

रणजी ट्रॉफीचे आयोजन यशस्वी ठरल्यास, पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या महिला प्रीमियर लीग 2027 स्पर्धेचे सामने वाराणसीमध्ये खेळवले जाऊ शकतात. (Photo: X)

3 / 5

डब्ल्यूपीएलच्या संचालन परिषदेने आगामी हंगामासाठी तीन शहरांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. यात वाराणसी, वडोदरा आणि मुंबईचे सीसीएम समाविष्ट आहेत. जर येथे सामने झाले, तर वाराणसी हे डब्ल्यूपीएलचे आयोजन करणारे देशातील सहावे शहर ठरेल. (Photo: X)

4 / 5

हे स्टेडियम आधुनिक सुविधांनी सज्ज असून यात काशीची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यात आली आहे. रणजी आणि डब्ल्यूपीएलच्या यशस्वी आयोजनानंतर येथे भविष्यात आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळवले जातील. (Photo: X)

5 / 5

डब्ल्यूपीएल 2027 च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा भव्य मिनी लिलाव 28 ऑक्टोबर रोजी केरळमधील कोची येथे पार पडणार आहे. या लिलावानंतर वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या सामन्यांचं ठिकाण ठरवलं जाईल. (Photo: X)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us