
रोहित शर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी ही विक्रमी कामगिरी केली आहे.

रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सलग 30 वेळा 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

रोहितने यासह श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जयवर्धन याने सलग 29 डावात दुहेरी आकडा गाठला होता.

रोहितने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 57 आणि पहिल्या डावात 80 धावांची खेळी केली.