
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी 2023 टीम इंडिया जोरदार तयारी करतेय. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit | BCCI)

विराट कोहली याच्यासह टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गदेवर नजर आहे. विराट कोहली आयपीएल 16 व्या मोसमातून आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर लंडनला पोहचला. (Photo Credit | BCCI)

विराट कोहली कदाचित घाईगडबडीत लंडनला पोहचला. यामुळेच लंडनला पोहचल्यानंतर विराटची घोडचूक समोर आली आहे. (Photo Credit | BCCI)

त्याचं झालं असं की विराट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी आरसीबीची किट बॅग घेऊन पोहचला. (Photo Credit | BCCI)

विराट कोहली याचा आरसीबीचा किट बॅगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit | BCCI)