सुबोध भावेची बर्थ डे पार्टी सचिन पिळगांवकरांनी गाजवली, नेमकं काय म्हणाले?

अभिनेता सुबोध भावेने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मराठी इंडस्ट्रीमधील बड्या कलाकारांसोबतच काही राजकीय व्यक्तींनी देखील वाढदिवसाला हजेरी लावली. दरम्यान, सचिन पिळगावकर यांनी पार्टी गाजवल्याचे म्हटले जात आहे.

Updated on: Nov 11, 2025 | 4:00 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून सुबोध भावे ओळखला जातो. सुबोध भावेने नुकताच त्याचा 50वा वाढदिवस साजरा केला. हा दिवस त्याच्यासाठी खास होता. कारण याच दिवशी त्याला इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असल्याची 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, सुबोधला शुभेच्छा देत सचिन पिळगाव करांनी मिश्किलपणे असं काही म्हटलं की त्याची चर्चा रंगली आहे. ते काय म्हणाले जाणून घ्या...

2 / 5
सुबोध भावेने 50व्या वाढदिवसाचे खास आयोजन केले होते. त्याने मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला मराठी सिनेसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार मंडळींनी हजेरी लावली. त्यासोबतच राजकीय वर्तुळातील काही लोक देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. सध्या सर्वत्र सुबोध भावेच्या वाढदिवसाच्या पार्टीची चर्चा रंगली आहे. खास करुन सचिन पिळगावकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

3 / 5
सचिन पिळगांवकर सुबोध भावेला शुभेच्छा देत मिश्लिकपणे म्हणाले, "सुबोध माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा स्तंभ आहे. कारण मी त्याचा नेहमी आभारी ऋणी राहीन, कारण कोणीही विचार केला नसता तो विचार त्याने केला आणि मला कट्यार काळजात घुसलीसाठी त्या रोलसाठी घेतलं. आयुष्यभरासाठी माझ्यासाठी एक मोठंसं काम करून गेला तो. तुझ्या या करेजची मी दाद देतो. मी आयुष्यभर तुझा एहसानमन ( ऋणी ) राहिन."

4 / 5
पुढे ते म्हणाले, "आता तर तुझ्या करिअरचे 25 वर्ष झाले, तुझ्या आयुष्याचे 50 वर्ष झाले. आम्हाला तुझ्या करिअरची 50 वर्ष सेलिब्रेट करायला आवडतील. ती तू करावी, आम्ही त्या सेलिब्रेशनला सुद्ध येऊ. तुझ्या करिअरची 50 वर्ष जेव्हा होतील तेव्हा अर्थातच तुझी दोन्ही मुलं खूप मोठी झालेली असतील. त्यांनी त्यांचं खूप मोठं नाव कमावलेलं असेल यात मला शंका नाही. तुझ्या दोन्ही मुलांपैकी कोणत्याही एका मुलावर मी बायोपिक करेन, पण रोल तू करणार. कारण तेव्हासुद्धा तू तितकाच पॉप्युलर असणार आहेस. अनेक आशीर्वाद आणि खूप खूप प्रेम."

5 / 5
सुबोध भावेने त्याचा 50वा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या वाढदिवशी कोणकोण उपस्थित होते हे दिसत आहे. सुबोधला शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. तसेच आशिष शेलार देखील हजर असल्याचे दिसत आहे.