भारताचा मोठा विजय, स्वदेशी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी, थेट..
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी बनावटीच्या प्रलय या क्वासी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. त्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी बनावटीच्या प्रलय या क्वासी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. प्रलय क्षेपणास्त्राची ही चाचणी गुरुवारी सकाळी 11.10 वाजता ओडिसाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कराम बेटावर करण्यात आली.
इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये तैनात असलेल्या विविध चाचणी उपकरणांद्वारे गोळा करण्यात आलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले की, चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाली आहेत. हा एक भारताचा मोठा विजय म्हणावा लागेल.
प्रलय हे डीआरडीओद्वारे विकसित केलेले स्वदेशी क्वासी-बॅलिस्टिक प्रकारचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. याची क्षमता 500 ते 1000 किलोग्रॅम इतकी आहे. देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रलय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी याबाबत पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
डीआरडीओने आज सकाळी 11:10 वाजता ओडिश्याच्या किनारपट्टीवर स्वदेशी प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. ही चाचणी वापरकर्ता मूल्यमापन चाचण्यांचा एक भाग म्हणून करण्यात आली.