नशेत लिहिलं, कुमार सानूनं गायलं अन् ‘हे’ गाणं हिट ठरलं; सुनील शेट्टीच्या त्या गाण्यामागची रंजक कहाणी काय?

सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं ‘हाय हुकू हाय हुकू हाय हाय...’ हे गाणं ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. मात्र या गाण्याच्या निर्मितीमागची कहाणी तितकीच रंजक आहे. गीतकार समीर अंजान यांनी सांगितल्यानुसार, गाणं तयार करण्याच्या आदल्या रात्री त्यांनी मित्रांसोबत मद्यपान केलं होतं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना हँगओव्हर होता. त्याच अवस्थेत आनंद-मिलिंद यांनी धून ऐकवली आणि त्यातून ‘हाय हुकू हाय हुकू हाय हाय...’ या लोकप्रिय ओळी जन्माला आल्या.

| Updated on: Sep 26, 2026 | 8:41 PM
1 / 6
९०चं दशक सिनेमा आणि संगीतविश्वासाठी सर्वात संस्मरणीय काळ मानलं जातं. या काळात अनेक कल्ट चित्रपटांसोबतच बॉलिवूडमधील अनेक आयकॉनिक गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली.

९०चं दशक सिनेमा आणि संगीतविश्वासाठी सर्वात संस्मरणीय काळ मानलं जातं. या काळात अनेक कल्ट चित्रपटांसोबतच बॉलिवूडमधील अनेक आयकॉनिक गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली.

2 / 6

अभिनेता सुनील शेट्टी यांना ९०च्या दशकातील सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोपी किशन’ या चित्रपटात सुनील शेट्टी यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.

3 / 6

या चित्रपटातील सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं ‘हाय हुकू हाय हुकू हाय हाय...’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. कुमार सानू आणि गायिका पूर्णिमा यांच्या आवाजातील हे गाणं आजही ९०च्या दशकातील कल्ट क्लासिक म्हणून आवडीने ऐकलं जातं.

4 / 6

या गाण्याच्या निर्मितीमागची कहाणीही तितकीच रंजक असून, गीतकार समीर अंजान यांनी एका कार्यक्रमात त्याचा किस्सा सांगितला होता. समीर अंजान यांच्या म्हणण्यानुसार, गाणं तयार करण्याच्या आदल्या रात्री त्यांनी मित्रांसोबत भरपूर मद्यपान केलं होतं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना हँगओव्हर होता.

5 / 6

त्याच अवस्थेत संगीतकार आनंद-मिलिंद यांचा फोन आला आणि सुनील शेट्टी यांच्या चित्रपटासाठी गाणं तयार करायचं असल्याचं सांगण्यात आलं; आनंद-मिलिंद यांनी धून गुणगुणल्यानंतर समीर यांनी त्यावर ‘हाय हुकू हाय हुकू हाय हाय...’ या ओळी जोडल्या.

6 / 6

अशाप्रकारे तयार झालेलं हे गाणं आजही कुमार सानू आणि पूर्णिमा यांच्या आवाजामुळे ९०च्या दशकातील लोकप्रिय आणि लक्षात राहिलेल्या गाण्यांपैकी एक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us