AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराचा एक्स्प्रेस -वे वर भीषण अपघात, फॉर्च्यूनरचं टायर फुटलं अन्…, पावसाच्या पाण्याने मोठा घात केला

भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. एक्स्प्रेस वे वर पावसाच्या पाण्यामुळे कार स्लीप झाल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पोलला धडकी आहे.

भाजप आमदाराचा एक्स्प्रेस -वे वर भीषण अपघात, फॉर्च्यूनरचं टायर फुटलं अन्..., पावसाच्या पाण्याने मोठा घात केला
BJP MLA accidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 8:30 PM
Share

उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. बुलंदशहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोटा कबूलपूर गावाच्या परिसरात गंगा एक्स्प्रेस -वे वर एक मोठा अपघात घडला आहे. बुलंदशहरच्या डिबाई विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. गंगा एक्स्प्रेस वे वर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं. या पाण्यामुळे कार स्लीप झाली आणि कार खांबाला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये आमदार चंद्रपाल सिंह लोधी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आमदारासोबतच त्यांचा गनर आणि चालक देखील जखमी झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 63 वर्षीय आमदार चंद्रपाल सिंह लोधी हे लखनऊन बुलंदशहराकडे निघाले होते. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची गाडी गंगा एक्स्प्रेस वे वरून पोटा कबूलपूर गावाच्या परिसरात आली कार भरधाव वेगात होती. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणी साचलं होतं. कार पाण्यामुळे स्लिप झाल्याने चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार तिथे असलेल्या एका खांबाला जाऊन धडकली. या अपघातामध्ये आमदार चंद्रपाल सिंह लोधी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा गनर आणि चालक देखील या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामध्ये कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर कारचं टायर देखील फुटलं तसेच समोरचा संपूर्ण भाग मोठ्या प्रमाणात डॅमेज झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एम्स रुग्णालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. चंद्रपाल सिंह यांचं कुटुंब देखील रुग्णालयात दाखल झालं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?