AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mattress Care : गादीवर झोपताना जुनाट कुबट वास येतोय? गादी न धुता फक्त ही ट्रिक वापरा, टेन्शनच संपेल!

गादी धुणं प्रत्येक वेळी शक्य नसतं, पण नियमित स्वच्छता आणि योग्य काळजी घेतल्यास वास कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय.

Mattress Care :  गादीवर झोपताना जुनाट कुबट वास येतोय? गादी न धुता फक्त ही ट्रिक वापरा, टेन्शनच संपेल!
cleaning hacksImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 8:26 PM
Share

गादीवर झोपताना अचानक कुबट किंवा जुनाट वास जाणवतोय ? गादी धुणं शक्य नाही आणि फक्त वासामुळे नवीन गादी घ्यायचीही इच्छा नाही? मग घरातल्या काही साध्या गोष्टी तुमच्या कामी येऊ शकतात . गादीवर सतत वापरामुळे घाम, शरीरावरील तेल, धूळ, मृत त्वचा आणि ओलावा जमा होऊ शकतो. त्यामुळे कालांतराने गादीला वास येण्याची शक्यता वाढते. मात्र काही सोप्या उपायांनी गादी धुवून न काढताही ती फ्रेश ठेवता येते.

गादी आधी व्हॅक्यूम करा.

गादीवर सतत वापरामुळे धूळ, केस, घाम आणि त्वचेचे छोटे कण जमा होतात. त्यामुळे गादीला हळूहळू कुबट किंवा जुनाट वास येऊ शकतो. वास घालवण्याआधी संपूर्ण गादी व्हॅक्यूम क्लिनरने व्यवस्थित स्वच्छ करा.

काही तास गादीला कडक उन्हात वाळवा

गादीला येणारा कुबट वास कमी करण्यासाठी तिला काही तास उन्हात ठेवू शकता. सूर्यप्रकाशामुळे गादीतील अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी मदत होते. गादीची दोन्ही बाजू व्यवस्थित सुकण्यासाठी ती मधेच पलटून ठेवा.

बेकिंग सोडा ठरू शकतो उपयोगी

गादीवर बेकिंग सोडा हलक्या हाताने पसरवा आणि साधारण ६ ते ८ तास तसाच राहू द्या. यामुळे गादीतील ओलावा आणि कुबट वास शोषून घेण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर गादी व्हॅक्युम करून बेकिंग सोडा पूर्णपणे काढून टाका.

व्हिनेगरचा हलका स्प्रे

पांढरा व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा. हे मिश्रण गादीवर जास्त प्रमाणात न टाकता फक्त वास येणाऱ्य भागावर हलका स्प्रे करा. त्यानंतर गादी पूर्णपणे कोरडी होऊ द्या आणि वापरण्यापूर्वी व्हिनेगरचा वासही निघून जाऊ द्या.

चादर आणि उशीचे कव्हरही स्वच्छ ठेवा

कधी कधी गादीला येणारा वास फक्त गादीमुळे नसतो. चादर, उशीचे कव्हर आणि मॅट्रेस प्रोटेक्टरवर साचलेल्या घाम व धूळही याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे यावस्तू नियमितपणे धुवून ठेवणे महत्त्वाचे आहे.

मॅट्रेस प्रोटेक्टरचा वापर करा

गादीवर मॅट्रेस प्रोटेक्टर वापरल्यास घाम, धूळ, डाग किंवा पाणी थेट गादीपर्यंत पोहोचण्यापासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते. प्रोटेक्टर काढून धुता येत असल्याने गादी स्वच्छ ठेवणेही सोपे होते.

गादीवर ओलावा साचू देऊ नका

पाणी, चहा किंवा दुसरा कोणताही द्रव गादीवर सांडल्यास लगेच स्वच्छ करा. गादी ओलसर राहिल्यास कुबट वासासोबतच बुरशीची समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळे गादी वापरण्यापूर्वी ती कोरडी आहे ना याची खात्री करा.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?