Instamart Layoff : स्विगी इन्स्टामार्टमध्ये मोठी नोकरकपात, AI मुळे कंपनीनं घेतला मोठा निर्णय, आता…

आपले कामकाज अधिक चांगले व्हावे यासाठी इन्स्टामार्टने हा निर्णय घेतलाय. संघटनात्मक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलाय. कार्पोरेट आणि सपोर्ट विभागात ही कर्मचारी कपात केली जाणार आहे.

| Updated on: Nov 28, 2026 | 3:50 PM
1 / 5
फूड आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या इन्स्टामार्टने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सधारण 340 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे.

फूड आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या इन्स्टामार्टने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सधारण 340 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे.

2 / 5

आपले कामकाज अधिक चांगले व्हावे यासाठी इन्स्टामार्टने हा निर्णय घेतलाय. संघटनात्मक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलाय. कार्पोरेट आणि सपोर्ट विभागात ही कर्मचारी कपात केली जाणार आहे.

3 / 5

इन्स्टामार्टने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केला आहे. जनरेटीव्ह एआय आणि काम करण्याची बदलेली पद्धत लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एकाच पद्धतीचे काम करणाऱ्या टीमची संख्या कमी करण्याचा यामागे हेतू आहे.

4 / 5

नंदिता सिन्हा या आता इन्स्टामार्टच्या नव्या सीईओ झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात हा निर्णय घेण्यात आलाय. 3 ऑगस्ट रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्या मिंत्रा या फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या प्रमुख होत्या.

5 / 5

दरम्या, एआय आणि काम करण्याची पद्धत बदलल्याने 340 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड पडली आहे. एआय, जनरेटिव्ह एआय यामुळे भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्या जातात की काय, असे या निमित्ताने विचारले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us