AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानींनी मनात आणलं तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील! डिलिमिटेशनला पाठिंबा देताच ओबीसी नेत्याचा मोठा दावा

अदानींच्या हातात देशातील सत्तेची सूत्रे असल्याचा दावा करत लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याबाबत त्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यांच्या वक्तव्यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे.

अदानींनी मनात आणलं तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील! डिलिमिटेशनला पाठिंबा देताच ओबीसी नेत्याचा मोठा दावा
Laxman Hake Supriya Sule Adani Sharad Pawar Political StatementImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 3:51 PM
Share

रवी लव्हेकर, पंढरपूर, टीव्ही९ मराठी, प्रतिनिधी:  डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत असल्यामुळे पवारांच्या पक्षाला सध्या टीकेचा सामना करावा लागतो आहे. विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिला असल्याचं आता जवळपास स्पष्ट होत आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे, जे सोमवारी सुरु होत आहे. त्यापूर्वी राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या या भूमिकेवरुन त्यांना लक्ष्य कलं आहे.

अदानींनी मनात आणलं तर सुप्रिया सुळे एका क्षणात मुख्यमंत्री होऊ शकतात, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. अदानीच देशातील सत्ता ठरवतात, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतही भाष्य केले. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा रंगली आहे. हाके शनिवारी पंढरपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी लक्ष्मण हाके यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकारणावर टीका केली. या सर्वांची धोरणे एकसारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण, हेच आता समजत नसल्याचे ते म्हणाले.

‘पवारांच्या कन्येला काहीही मिळू शकते’

ज्या अदानींचे, नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे मित्र शरद पवार आहेत, त्या पवारांच्या कन्येला काहीही मिळू शकते. उद्या अदानींनी मनात आणले तर सुप्रिया सुळे एका क्षणात मुख्यमंत्री होतील. अदानीच इथली सत्ता ठरवतात, हे शक्य आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

शरद पवारांवरही निशाणा

शरद पवार यांच्यासारखा फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार सांगणारा नेता भाजपच्या हातात हात घालून काम करत असेल, तर पुरोगामी विचार कुठे राहिला, असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांची खासदार म्हणून वेगळी ओळख आहे. मात्र, त्या भाजपचे समर्थन करत असतील, तर विरोधक कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘सगळे एकाच धोरणाने काम करत आहेत’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील आमदार-खासदार एकाच धोरणाने काम करत असल्याचा आरोपही हाके यांनी केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातही असेच चित्र असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Follow Us
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!