अवघ्या एक रुपयांच्या टी- शर्ट दिवाळी ऑफरचा धुमाकुळ, तरुणांची तोबा गर्दी, आवरण्यासाठी बाऊन्सर ते पोलिसांची कुमक…

एरव्ही कोणतीही ऑफर म्हटले की महिलांची गर्दी होत असते. परंतू आता एक रुपयात टी-शर्ट मिळणार या ऑफरमुळे तरुणांची संभाजीनगरात इतकी गर्दी उसळली की गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.

| Updated on: Nov 05, 2026 | 8:56 PM
1 / 5
 दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका कपड्याच्या दुकानात अवघ्या एका रुपयात टी-शर्ट देण्याची ऑफर ठेवण्यात आली होती.

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका कपड्याच्या दुकानात अवघ्या एका रुपयात टी-शर्ट देण्याची ऑफर ठेवण्यात आली होती.

2 / 5

या ऑफरला भुलून शेकडो तरुणांना या आऊटलेटमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जसजसा सुर्यवर येऊ लागला तसे या दुकानातील गर्दीचा भर वाढतच गेला.

3 / 5

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील ब्रँड ट्वेंटी या दुकानात पहिल्या येणाऱ्या 500 ग्राहकांना अवघ्या 1 रुपयात टी-शर्ट देण्यात येणार होता.

4 / 5

या ऑफरची माहिती मिळताच हजारो ग्राहकांनी दुकानाबाहेर गर्दी केली. गर्दी इतकी वाढली की दुकानदाराला या गर्दीला आवरणं कठीण झाले.

5 / 5

या गर्दीला आवरण्यासाठी आधी बाऊन्सर बोलावण्यात आले, मात्र गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ही गर्दी पांगवली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us