TVK Vijay: निकालाच्या दिवशी थलपती विजयकडून त्रिशा कृष्णनला वाढदिवसाची मोठी भेट

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. शंभरहून अधिक जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. विशेष म्हणजे या निकालाच्या दिवशीच विजयसोबत नाव जोडल्या जाणाऱ्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा वाढदिवस आहे.

| Updated on: May 04, 2026 | 12:28 PM
1 / 5
साऊथ सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून जोडलं जात आहे. परंतु आज तमिळनाडू विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्रिशा निकालाच्या दिवशीच तिरुपतीला बालाजींच्या दर्शनासाठी पोहोचली.

2 / 5
विशेष म्हणजे आज (4 मे) त्रिशाचा 43 वा वाढदिवससुद्धा आहे. यानिमित्त ती सकाळी सकाळीच तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तर दुसरीकडे कथित प्रियकर विजय यांच्या पक्षाचा विजय व्हावा म्हणून ती देवाकडे साकडं घालायला गेल्याचीही चर्चा आहे. या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीकेनं दमदार पदार्पण केलं आहे.

3 / 5
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सेंच्युरी पार केली आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील प्रस्थापितांना हा सर्वांत मोठा धक्का आहे. त्यामुळे एका अर्थी त्रिशाला तिच्या वाढदिवशी विजय यांनी मोठी भेट दिल्याचं म्हटलं जात आहे.

4 / 5
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान थलपती विजय यांचं त्रिशासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. कारण विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत त्यांचं एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. ‘लिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगपासून त्रिशा आणि थलपती विजय यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

5 / 5
एका मुलाखतीत विजय यांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याभोवती असलेल्या अलिकडच्या समस्यांबद्दल काळजी करू नका. कारण त्यावर तुम्ही तुमचा वेळ घालवण्याइतक्या त्या समस्या महत्त्वाच्या नाहीत. मी स्वत: त्यांची काळजी घेईन. माझ्या समस्यांमुळे तुम्हाला दु:खी किंवा तणावग्रस्त होताना पाहून मला सर्वांत जास्त त्रास होतो”, असं त्यांनी म्हटलं होतं.

Follow Us