‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाभाभीची एन्ट्री कधी होणार? महत्वाची अपडेट आली समोर
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाभाभीची एन्ट्री कधी होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. यावर आता असित मोदींनी मोठं भाष्य केले आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दयाभाभीचं पात्र सर्वाधिक चर्चेत राहिलेलं आहे. दिशा वकानीने साकारलेल्या दयाभाभी पात्राने प्रेक्षक, चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेत दयाभाभी पात्राची पुन्हा एन्ट्री कधी होणार, यावर मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान असितकुमार मोदी यांनी मालिकेतील सर्व पात्रांविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी दयाभाभीच्या मालिकेतील पुनरागमनाविषयही भाष्य केलं.
दिशा वकानीने साकारलेल्या दयाभाभी पात्राची बोलण्याची गुजराती शैली हटके ठरली. दिशा ही 'हे माँ माताजी'च्या डायलॉगमुळे लोकप्रिय झाली होती. दिशा वकानीने ज्या पद्धतीने पात्र साकारलं, ते खूप चांगलं होतं, असे मोदी म्हणाले.
मालिकेतील दयाभाभीच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीचा शोध सुरू होणार असल्याची माहिती असित मोदी यांनी दिली. फक्त पात्र साकारणारी नव्हे, तर गुजराती भाषेचं ज्ञान हवं आणि पात्राला न्याय देऊ शकेल. आता दयाभाभीचं पात्र साकारेल, अशा अभिनेत्रीला शोधणे महत्त्वाचे आहे, असे मोदींनी सांगितले.
असित मोदींनी मालिकेत दयाभाभींच्या पुनरागमबाबत महत्वाचं भाष्य केलं. दयाभाभीच्या पात्राची कधी एन्ट्री होणार, याबाबत विशिष्ट तारीख किंवा कालावधी सांगितला नाही. मालिकेतील दयाभाभी पात्राची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. दयाभाभीच्या जागी नव्या अभिनेत्रीची निवड होऊन कधी पडद्यावर दिसेल, याबाबत कोणतीही अंतिम तारीख देखील समोर आलेली नाही. परंतु चाहत्यांना काही काळ प्रतिक्षा करावी लागेल, असे असित मोदींनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले.