किंमत 7,39,990 ने सुरु, 24 KM मायलेज, सनरूफ आणि ADAS, Tata Motors ची सर्वाधिक विक्री झालेली कार…

Tata Motors च्या कारचा ऑक्टोबर 2026 च्या बाजारात दबदबा पाहायला मिळाला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 73,894 यूनिटची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 21% जास्त आहे. Nexon पुन्हा एकदा कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. परंतू Punch आणि नव्या Sierra कारने देखील सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. अखेर टाटाची कोणती कार किती विकली गेली आणि कोणत्या मॉडेलची मागणी वाढली कोणत्या घटली पाहूयात...

| Updated on: Nov 16, 2026 | 7:38 PM
1 / 7
Tata Nexon: टाटा मोटर्सची सर्वात प्रसिद्ध एसयुव्ही टाटा  नेक्सॉन ऑक्टोबर  2026 मध्ये देखील कंपनीची बेस्ट-सेलींग कार बनली आहे. गेल्या महिन्यात याच्या एकूण 21,966 यूनिटची विक्री झाली आहे. तर ऑक्टोबर  2025 मध्ये हा आकडा 22,083 यूनिट होता. वार्षिक आधारे नेक्सॉनच्या विक्रीत 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये याची पकड आणि ग्राहकांदरम्याने प्रसिद्धी आधी सारखीच खूप मजबूत आहे.

Tata Nexon: टाटा मोटर्सची सर्वात प्रसिद्ध एसयुव्ही टाटा नेक्सॉन ऑक्टोबर 2026 मध्ये देखील कंपनीची बेस्ट-सेलींग कार बनली आहे. गेल्या महिन्यात याच्या एकूण 21,966 यूनिटची विक्री झाली आहे. तर ऑक्टोबर 2025 मध्ये हा आकडा 22,083 यूनिट होता. वार्षिक आधारे नेक्सॉनच्या विक्रीत 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये याची पकड आणि ग्राहकांदरम्याने प्रसिद्धी आधी सारखीच खूप मजबूत आहे.

2 / 7

टाटा नेक्सॉनची एक्स शोरुम किंमत ₹7,39,990 रुपयांनी सुरु होते. बोल्ड आणि मॉडर्न डिझाईनसह LED लाईट्स आणि ड्युअल-टोन ऑप्शन उपलब्ध आहेत. हीचे इंटेरिअर प्रीमियर आहे. यात 10.25 इंचाचा टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, वेंटिलेटेड सीट्स आणि पॅनोरेमिक सनरूफसह वायरलेस कनेक्टिविटी, जेबीएल साऊंड आणि 360° कॅमरा आहे. सेफ्टीत या कारला 5-स्टार NCAP रेटिंग,सहा एअरबॅग आणि ADAS मिळते. 1.2L पेट्रोल (120 PS)आणि 1.5L डीझेल (115 PS) इंजिनासह ही 17-24 किमी/लिटरपर्यंतचे मायलेज देते.

3 / 7

Tata Punch: मायक्रो एसयूवी सेगमेंटची बादशाह Tata Punch ने ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 20,525 यूनिट विकले गेले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये विकले गेलेल्या 16,810 यूनिटच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. वार्षिक विक्रीआधारे या कारच्या विक्रीत 22 टक्के वाढ झाली आहे. कमी किंमत, दमदार बिल्ड क्वालिटी आणि मल्टीपल पावरट्रेन पर्यायांमुळे ही कार ग्राहकांची पहिली पसंद बनली आहे.

4 / 7

Tata Tiago: टाटाच्या एंट्री लेव्हलची हॅचबॅक टिआगोची विक्रीत ऑक्टोबर 2026 थोडी सुस्ती राहिली आहे, गेल्या महिन्यात या कारला 8,043 नवीन ग्राहक मिळाले. ऑक्टोबर 2025 मध्ये टियागोचे 8,850 यूनिट विकले गेले होते. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 9 टक्के घसरल झाली आहे. तरीही सीएनजी आणि इलेक्ट्रीक व्हेरिएंट्सच्या दमवर ही हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपली मजबूत प्रझेन्स कायम बनवून आहे.

5 / 7

Tata Aeris: टाटा मोटर्सच्या लाइनअपमध्ये सामील नवीन कार Tata Aeris ला देखील ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये या नव्या मॉडेलची एकूण 4,005 यूनिट विक्री झाली. लाँच सुरुवातीच्या महिन्यातच चार हजाराहून अधिक युनिटची विक्री झाल्याने ही भविष्य उज्वल आहे.

6 / 7

Tata Sierra: टाटा मोटर्सची आयकॉनिक नेमप्लेट वाली नवीन एसयूवी Tata Sierra ने भारतीय बाजारात शानदार सुरुआत करत चांगल्या विक्रीचे आकडे सादर केले आहेत. ऑक्टोबर 2026 मध्ये या नवीन एसयूव्हीच्या एकूण 7,205 यूनिट विकले गेले. मॉडर्न डिझाईन, प्रीमियम फिचर्स आणि दमदार रोड प्रेझेंसमुळे ग्राहक त्यास पसंद करत आहेत.

7 / 7

टाटाच्या कंपनीच्या टॉप-5 मॉडेल्स शिवाय गेल्या ऑक्टोबरात Harrier चे 3,895 यूनिट, Altroz चे 3,257 यूनिट, Tata Curvv चे 2,377 यूनिट, Tata Safari चे 2,287 यूनिट आणि Tata Tigor चे 334 यूनिट विक्री झाली आहे. या ऑक्टोबर 2025 मध्ये या कारची एकूण विक्री 61,134 यूनिटच्या तुलनेत वार्षिक स्तरावर यंदा 21 टक्के वाढ झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us