AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी विलीनीकरणावर लवकरच मोठा गौप्यस्फोट? तटकरेंच्या नव्या विधानाने राजकारणात खळबळ, नेमकं काय साांगणार?

आपण विलीनीकरणाच्या तारखांचा उल्लेख त्यावेळी का केला नाही आणि आता का केला, यामागील राजकीय कारण योग्य वेळी सांगेन, असं सूचक विधानही तटकरे यांनी केलं. त्यामुळे आता तटकरे राज्याच्या राजकारणात विलीनीकरणावर नेमका काय गौप्यस्फोट करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी विलीनीकरणावर लवकरच मोठा गौप्यस्फोट? तटकरेंच्या नव्या विधानाने राजकारणात खळबळ, नेमकं काय साांगणार?
Sunil TatkareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 7:23 PM
Share

Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू होती. खासदार सुनील तटकरे यांनी विलीनीकरण होणार होते, असे सांगून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी अगोदर विलीनीकरणाबाबत अजितदादांनी मला काहीही सांगितलेले नाही, अशी भूमिका त्यांनी उघडपणे घेतली होती. शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा विषय आता मागे पडला. यावर कोणतीही चर्चा नाही, असं स्पष्ट केलंय. दरम्यान, आता सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा विलीनीकरणावर सूचक विधान केलंय. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटलंय.

या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही

सुनील तटकरे हे राजयगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी खास बातचित केली. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही ते बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एनडीएमधील भूमिकेवरही तटकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये एकत्र आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. आम्ही कालही एनडीएमध्ये होतो, आजही आहोत आणि भविष्यातही एनडीएमध्येच राहणार आहोत, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील काळातही वाटचाल करेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

अजितदादा असते तर…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे यांनी आपल्या पूर्वीच्या विधानावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी विलीनीकरणाबाबत काही नव्याने चर्चा सुरू आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी विलीनीकरणाचा विषय संपला आहे, असं सांगितल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अजितदादा असते तर 12 फेब्रुवारीला विलीनीकरण झालं असतं, असंही मी त्यावेळी बोललो होते, याचा तटकरेंनी पुनरुच्चार केला.

यामागील राजकीय कारण योग्य वेळी सांगेन

विशेष म्हणजे, त्यावेळी आपण या तारखांचा उल्लेख का केला नाही आणि आता का केला, यामागील राजकीय कारण योग्य वेळी सांगेन, असं सूचक विधानही तटकरे यांनी केलं. त्यामुळे आता तटकरे राज्याच्या राजकारणात विलीनीकरणावर नेमका काय गौप्यस्फोट करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यावेळीही मला विलीनीकरणाबाबत माहिती होतं आणि आताही माहिती आहे; मात्र त्यावेळी तारखा सांगितल्या नव्हत्या, आता सांगितल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा विषय संपल्याचं म्हटलं आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनेही विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. सध्या माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे, असही तटकरे म्हणालेत. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!