AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare: अभिमन्यू झालो असेल तर चक्रव्यूह भेदण्याचा विचार करेन; सुनील तटकरे यांचा राजकारणावर सूचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Sunil Tatkare Reaffirms NCP Political Stand: महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंनी मिश्किल प्रत्युत्तर दिलं आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवरही त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

Sunil Tatkare: अभिमन्यू झालो असेल तर चक्रव्यूह भेदण्याचा विचार करेन; सुनील तटकरे यांचा राजकारणावर सूचक टोला, नेमकं काय म्हणाले?
Sunil Tatkare's Sarcastic Reply to Mahendra Dalvi
| Updated on: Nov 16, 2026 | 7:07 PM
Share

आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने केली जाणारी टीका आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेच्या शिंदे गटात होत असलेले प्रवेश, या दोन्ही मुद्द्यांवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्र दळवी यांच्या टीकेला उत्तर देताना इतकं प्रचंड बौद्धिक ज्ञान ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पामराने काय बोलावं, असा उपरोधिक टोला तटकरे यांनी लगावला.

तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान कालही होतं, आजही आहे आणि उद्याच्या भविष्यातही तितकंच भक्कम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करत असले तरी राष्ट्रवादीचं जिल्ह्यातील स्थान कायम राहील, असा संदेशच तटकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहे. रायगडच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांना पत्रकाराने अभिमन्यूची उपमा देत प्रश्न विचारला. रायगडच्या राजकारणात तुमचा अभिमन्यू झालाय का, असा सवाल करताच तटकरे यांनीही मिश्किल शैलीत उत्तर दिलं.

ते म्हणाले की, अभिमन्यू झाला असेल तर चक्रव्यूह कसा भेदायचा, याचा विचार करेन. अशी परिस्थिती यापूर्वीही दोन-तीन वेळा येऊन गेली आहे. मात्र, अशा परिस्थितीतून मी दोन-तीन वेळा बाहेर पडलो आहे आणि आज तुमच्यासमोर खासदार म्हणून बसलो आहे, एवढं खरं, असा मिश्किल टोला तटकरे यांनी लगावला. आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या या विधानाची रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एनडीएमधील भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये एकत्र आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. आम्ही कालही एनडीएमध्ये होतो, आजही आहोत आणि भविष्यातही एनडीएमध्येच राहणार आहोत, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील काळातही वाटचाल करेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे यांनी आपल्या पूर्वीच्या विधानावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी विलीनीकरणाबाबत काही नव्याने चर्चा सुरू आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी विलीनीकरणाचा विषय संपला आहे, असं सांगितलं होतं. मात्र, अजितदादा असते तर 12 फेब्रुवारीला विलीनीकरण झालं असतं, असंही त्यावेळी म्हटलं होतं, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

विशेष म्हणजे त्यावेळी आपण या तारखांचा उल्लेख का केला नाही. आता का केला, यामागील राजकीय कारण योग्य वेळी सांगेन, असं सूचक विधानही सुनील तटकरे यांनी केलं. त्यावेळीही मला माहिती होतं आणि आताही माहिती आहे. मात्र त्यावेळी तारखा सांगितल्या नव्हत्या, आता सांगितल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा विषय संपल्याचं म्हटलं आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनेही विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. सध्या माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!