2 तास 7 मिनिटांचा भयानक सिनेमा… रात्री एकट्याने पाहण्यासाठी हिम्मत हवी; ओटीटीवर घालतोय धुमाकूळ

जेव्हा हॉरर चित्रपटांचा विषय निघतो, तेव्हा सर्वात आधी हॉलिवूड चित्रपट डोळ्यांसमोर उभे राहतात. कारण हॉलिवूडमध्ये बनवलेल्या हॉरर चित्रपटांचे कथानकही खूप वेगळे असते आणि आज आम्ही तुम्हाला अशाच एका हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही एकट्याने पाहू शकत नाही...

| Updated on: Jul 21, 2026 | 5:34 PM
1 / 5
जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशा हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात भयानक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट इतका भयानक आहे की, तो एकटीने पाहण्याची हिम्मत करू नका. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे ‘हेरेडिटरी.’

जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशा हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात भयानक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट इतका भयानक आहे की, तो एकटीने पाहण्याची हिम्मत करू नका. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे ‘हेरेडिटरी.’

2 / 5

‘हेरेडिटरी’ हा २०१८ साली रिलीज झाला होता. एरी एस्टर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आणि दिग्दर्शनही केले. टोनी कोलेट, एलेक्स वोल्फ, मिल्ली शापिरो, अ‍ॅन डाउड आणि गेब्रियल बर्न यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा एका दुःखी कुटुंबाची कहाणी सांगतो. हा सिनेमा प्रेक्षकांना घाबरवण्यात खूप यशस्वी ठरला होता.

3 / 5

सिनेमाची सुरुवात एका सामान्य कुटुंबापासून होते. त्यांचे जीवन एका भयानक रहस्यामुळे पूर्णपणे उध्वस्त होते. कहाणी जसजशी पुढे सरकते, तसतसे तुम्हाला धक्का बसेल. सिनेमामधील सस्पेन्स पाहून तुम्ही हैराण व्हाल. आईएमडीबीवर या सिनेमाला ७.३ रेटिंग मिळाले आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत असे भय निर्माण करते की, रात्रभर झोप येणार.

4 / 5

अंदाजे १० मिलियन डॉलर (सुमारे ८३ कोटी रुपये) बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात सुमारे ९० मिलियन डॉलर (७४७ कोटी रुपये) कमाई केली. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आतापर्यंत सर्वात भयानक सिनेमा पाहिला आहे, तर ‘हेरेडिटरी’ तुमची ती समजूत पूर्णपणे बदलून टाकेल.

5 / 5

हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. तसेच नेटफ्लिक्स वरही तुम्ही तो पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या सिनेमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us