
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकचा आणखी एक महत्त्वाचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस वे देशाला समर्पित करतील.

8480 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या 118 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांवरून केवळ 75 मिनिटांवर येणार आहे.

पंतप्रधान मोदी या वर्षी सहाव्यांदा कर्नाटकात जात आहेत. राज्यात एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दुपारी 12 वाजता मंड्यातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी धारवाडला जाणार आहेत. दुपारी 3.30 वाजता आयआयटी धारवाडला भेट देतील.

दुपारी 4 वाजता विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटन करतील. हुबळी-धारवाड दरम्यान दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार.

सध्या कर्नाटकात भाजपच्या चार विजय संकल्प यात्रा सुरू आहेत. त्यांची सांगता 25 मार्च रोजी मोठ्या जाहीर सभेच्या रूपाने होणार आहे. या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा कर्नाटकचा दौरा करणार आहेत.