
बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. बिग बाॅस 17 कडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, एका रिपोर्टमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.

बिग बाॅस 17 मध्ये सलमान खान हा शो होस्ट करताना दिसणार नाहीये. चित्रपटांचे बिझी शेड्युल असल्याने सलमान खान मुंबईमध्ये नसणार असल्याचे सांगितले जात आहे.

बिग बाॅस 17 ला जरी सलमान खान विकेंडच्या वारला होस्ट करताना दिसणार नसलातरीही फिनालेला सलमान खान हा धमाका करणार आहे.

सलमान खान हा बिग बाॅस 17 होस्ट करणार नसल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी निराशा ही बघायला मिळत आहे.

बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांनी यावर अजूनही काही खुलासा केला नाहीये. महेश मांजरेकर किंवा करण जोहर हा बिग बाॅस 17 ला होस्ट करू शकतो.