
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनला बाॅलिवूड कलाकार उपस्थित होते.

फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर विदेशातूनही लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल तीन दिवस हे प्री वेडिंग फंक्शन गुजरात येथे सुरू होते.

आता लोक अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे.

अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न विदेशात पार पडणार असल्याचे सांगितले जातंय. लंडन येथील स्टोक पार्क एस्टेट येथे हे लग्न करणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

हेच नाही तर नीता अंबानी या स्वत: लग्नाच्या तयारीकडे लक्ष देत असल्याचे सांगितले जातंय. लग्नाचे निमंत्रण बाॅलिवूड कलाकारांना पाठवणे सुरू असून यानुसार कलाकार आपले शेड्यूल ठरू शकतात.